Thursday, March 26 2026 | 04:14:46 PM
Breaking News

प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Connect us on:

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले.

एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे:

“प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कोट्यवधी जनांप्रमाणे मी सुद्धा येथील दिव्यत्वाच्या अनुभूतीने भारून गेलो आहे.

शांती, शहाणीव, उत्तम आरोग्य आणि सुसंवाद यांचा  आपणा सर्वांना माता गंगेचा आशीर्वाद लाभो.”

प्रयागराज महा कुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा अर्चा करण्याचे  परम भाग्य लाभले. माता गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने अतिशय शांत वाटते आहे. संपूर्ण देशाला सुख शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा अशी कामना मां गंगेकडे केली. हर – हर गंगे

प्रयागराज मधल्या दिव्य भव्य महा कुंभामध्ये श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम प्रत्येकाला भारावून टाकत आहे. पावन पूर्ण कुंभातील स्नानाची काही क्षणचित्रे.

About Matribhumi Samachar

Check Also

कळंबी गावात मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन, ११४ रुग्णांना मिळाला लाभ

कळंबी (ता. कळमेश्वर, जि. नागपूर), २१ मार्च, २०२६: अदानी समूहाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत बुधवारी कळंबी गावातील …