Wednesday, December 31 2025 | 03:06:21 PM
Breaking News

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या हस्ते नोएडा येथील एनआयईएलआयटी सेंटर ऑफ एक्सलन्स इन चिप डिझाईनचे उद्घाटन

Connect us on:

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी काल एनआयईएलआयटी, अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या, नोएडा कॅम्पस मधील सेंटर ऑफ एक्सलन्स इन चिप डिझाइन (चीप डिझाईन उत्कृष्टता केंद्र) चे उद्घाटन केले.

एसओसीटेप सेमीकंडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, या डीपीआयआयटी-मान्यताप्राप्त स्टार्टअपच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, भारताच्या सेमीकंडक्टर डिझाइन आणि विकास क्षमतेच्या प्रगतीच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे.

चिप डिझाइनमध्ये एनआयईएलआयटी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन, हे सेमीकंडक्टर तंत्रज्ञान क्षमता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान भक्कम करण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाला अनुसरून आहे.

सेमीकंडक्टर आणि चिप डिझाइन उद्योगातील कुशल व्यावसायिकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, व्हीएलएसआय (मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण) आणि चिप डिझाइनमध्ये संशोधन, नवोन्मेष आणि प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स सज्ज आहे.

व्हीएलएसआय आणि चिप डिझाईनमध्ये संशोधन, नवोन्मेश आणि प्रशिक्षणाला चालना

सेमीकंडक्टर नवोन्मेषात जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याच्या दृष्टीकोनासह, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक केंद्र म्हणून भारताला सक्षम बनवताना,  व्हीएलएसआय आणि चिप डिझाईनला पुढे नेणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि उद्योग सहकार्याला चालना देऊन, सेमीकंडक्टरच्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी नवोन्मेषाला चालना देण्याचा आणि अत्यंत कुशल प्रतिभेचे भांडार विकसित करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, ज्यामुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे स्थान मजबूत होईल.

उद्घाटनप्रसंगी एस. कृष्णन यांनी प्रोजेक्ट लॅब (प्रकल्प प्रयोगशाळा) आणि स्मार्ट क्लासरूमसह केंद्राच्या अत्याधुनिक सुविधांना भेट दिली. प्रोजेक्ट लॅब विद्यार्थी, व्यावसायिक आणि संशोधकांसाठी  नावोन्मेषी चिप डिझाईन प्रकल्पांवरील सहयोगाचे केंद्र म्हणून काम करेल. दरम्यान, प्रगत शिक्षण साहित्याने सुसज्ज असलेल्या स्मार्ट क्लासरूम विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आगळा अनुभव देईल.

सेमीकंडक्टर क्षेत्रात बौद्धिक संपदेचे डिझाईन आणि विकास पुढे नेण्यासाठी केंद्राची वचनबद्धता अधोरेखित करून, व्हीएलएसआय-आधारित बौद्धिक संपदा (आयपी) विषयक विशेष प्रात्यक्षिक देखील यावेळी आयोजित करण्यात आले. व्हीएलएसआयमध्ये ज्ञानाचा भक्कम पाया निर्माण करण्यात आणि उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतिभा जोपासण्यात असलेली केंद्राची भूमिका या प्रात्यक्षिकात अधोरेखित करण्यात आली.

About Matribhumi Samachar

Check Also

नोव्हेंबर 2025 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा त्वरित अंदाज आणि वापर आधारित निर्देशांक जाहीर (पायाभूत वर्ष 2011-12=100)

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. ​उत्पादन क्षेत्रातील 8.0 टक्के वाढीमुळे, नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने …