नवी दिल्ली, 5 जून 2025. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि किर्गिझस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झीनबेक कुलुबाएव मोल्डोकानोविच यांनी आज नवी दिल्ली येथे भारत आणि किर्गिझिस्तान दरम्यानच्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आणि सहमतीपत्राचे आदानप्रदान केले.


भारत सरकार आणि किर्गिझस्तान सरकार यांच्यात 14 जून 2019 रोजी बिश्केक येथे स्वाक्षरी झालेला द्विपक्षीय गुंतवणूक करार (बीआयटी) आजपासून, म्हणजे 5 जून 2025 पासून अमलात येत आहे. हा नवा बीआयटी 12 मे 2000 रोजी लागू करण्यात आलेल्या आधीच्या कराराची जागा घेईल, ज्यामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणुकीच्या सुरक्षेत सातत्य राहील.


भारत-किर्गिस्तान बीआयटी हा द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्यामधील आणि सुरक्षित आणि अंदाज करता येण्याजोग्यागुंतवणुकीचे वातावरण निर्माण करण्यामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
बीआयटी, दोन्ही देशांच्या नियामक अधिकारांचे सार्वभौमत्व कायम ठेवत गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संतुलन साधते तसेच एक लवचिक आणि पारदर्शक गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करण्याप्रति सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
यामुळे सीमेपलिकडून गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि भारत आणि किर्गिझस्तान मधील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होईल अशी आशा आहे.
Matribhumi Samachar Marathi

