Saturday, January 24 2026 | 10:09:03 PM
Breaking News

एससीझेडसीसी नागपूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत कार्यक्रमांची मालिका आयोजित

Connect us on:

नागपूर, 5 ऑगस्ट 2025. 2  ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरे होत असलेल्या देशव्यापी “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (SCZCC), नागपूरच्या नागरिकांमध्ये एकता, देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून, केंद्राचा परिसर आकर्षक तिरंगी रोषणाईने सजवण्यात आला आहे.  यामुळे मोहिमेच्या भावनेचे प्रतिध्वनी करणारे एक आकर्षक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रध्वजाच्या रंगांनी मने आणि घरे उजळून निघत आहे.

या उत्सवाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 6 ते 10 ऑगस्ट 2025 पर्यन्त दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत केंद्राच्या परिसरात रांगोळी कार्यशाळा आयोजित केली जाईल. ही कार्यशाळा मुंबईतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार  समीर गोपाळ पेंडुरकर त्यांच्या चमूसह आयोजित करतील. कार्यशाळेदरम्यान तयार केलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन 11 ते 15 ऑगस्ट 2025  दरम्यान जनतेसाठी खुले असेल, ज्यामध्ये तिरंग्याने प्रेरित कलात्मक अभिव्यक्तींचे एक आकर्षक प्रदर्शन सादर केले जाईल.

कार्यशाळेव्यतिरिक्त, केंद्राच्या मोहिमेचा भाग म्हणून विविध जनसहभाग कार्यक्रम आयोजित करेल. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, तिरंगा रॅली, तिरंगा सजावट उपक्रम आणि “तिरंगा विथ सेल्फी” उपक्रम यांचा समावेश आहे.

नागपूर येथील एससीझेडसीसीच्या संचालक श्रीमती आस्था कार्लेकर यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि ती यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना या मोहिमेअंतर्गत स्वयंसेवक बनण्याचे आणि इतरांना त्यांच्या घरी तिरंगा फडकविण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले जात आहे. ते त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवू शकतात, तिरंग्यासोबत सेल्फी घेऊ शकतात आणि अधिकृत वेबसाइट harghartiranga.com वर अपलोड करू शकतात, ज्यामुळे लाखो भारतीयांना अभिमानाने राष्ट्रप्रेम दाखवण्यात सामील होता येईल.

About Matribhumi Samachar

Check Also

सेव्हलाइफ फाउंडेशन आणि पार्ले बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून नागपूरमधील ग्रामीण रुग्णालयांना गंभीर शस्त्रक्रिया उपकरणे सुपूर्द

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या उच्च-जोखीम असलेल्या कॉरिडॉरवर असलेल्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय आणि ट्रॉमा केअर सेवा …