नागपूर 5 डिसेंबर 2025
मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती करून त्याद्वारे भाजीपाला निर्माण केल्यास आपण जे मातीला दिलं तीच माती आपल्याला भरभरून देईल असे प्रतिपादन नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फोर्स एनडीआरएफ अकॅडमी चे नागपूर येथील उपमहासंचालक डॉ . हरिओम गांधी यांनी केलं .केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधीन गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज 5 डिसेंबर जागतिक मृदा दिनी रोजी सेंद्रीय शेती संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज सिव्हिल लाईन्स येथील एनडीआरएफ अकॅडमी येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते .याप्रसंगी रीजनल सेंटर फॉर ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग आर सी ओ एन एफ नागपूरचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय राजपूत उपस्थित होते.
यावर्षी जागतिक मृदा दिना ची संकल्पना ही ‘ हेल्दी सॉईल फॉर हेल्दी फ्युचर ‘ अशी असून त्याच अनुषंगाने ‘वन हेल्थ ‘ संकल्पना केंद्र शासन राबवत असल्याचं आरसीओएनएफचे प्रादेशिक संचालक डॉ . राजपूत यांनी सांगितले .जर मृदेचे आरोग्य चांगले असेल तरच पीक आणि वनस्पतीचे आरोग्य चांगले राहते आणि पर्यायाने पशुधन आणि मानवी आरोग्य चांगले राहते असे त्यांनी स्पष्ट केले .
या कार्यशाळेचा उद्देश नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीतील तत्वे ,गुड प्रॅक्टिसेस ,मान्यतेसाठीच्या गरजा आणि या संदर्भातील केंद्रीय शासनातर्फे लागू असलेल्या योजनांची माहिती प्रगतीशील शेतकरी यांना देऊन या माहितीची देवाण-घेवाण पुढील शेतकऱ्यांना देणे असा होता. या कार्यशाळेला प्रगतिशील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक संघ उपस्थित होते . याप्रसंगी चित्र प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते.
Matribhumi Samachar Marathi

