Tuesday, January 27 2026 | 01:53:37 PM
Breaking News

जळगाव रनर ग्रुप आयोजित “खानदेश रन” च्या आठव्या पर्वाला केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Connect us on:

जळगाव. जळगाव रनर ग्रुप आयोजित प्रतिष्ठित “खानदेश रन” चे आठवे पर्व उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे भव्य उद्‌घाटन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

खानदेश रनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी यासारख्या विविध धावण्याच्या श्रेण्या समाविष्ट होत्या. फिटनेसप्रेमी आणि धावपटूनी या कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेतला आणि फिटनेस आणि एकतेचा संदेश दिला.

आरोग्य आणि फिटनेससाठी धावण्याच्या महत्त्वावर रक्षा खडसे यांनी जोर देत सांगितले की, खानदेश रनसारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येईल. हा समूह आरोग्य आणि फिटनेसविषयी जनजागृती करण्यासाठी प्रेरणादायक कार्य करत असल्याचे त्या म्हणाल्या.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वस्थ आणि सक्रिय भारताच्या स्वप्नाचे प्रतिबिंब या कार्यक्रमात दिसून आले. फिटनेस हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे, यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. विविध श्रेण्यामधील विजेत्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले, तसेच सर्व सहभागींसाठी प्रमाणपत्रे आणि पदकांचे वितरण करण्यात आले.

About Matribhumi Samachar

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे केले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे …