Thursday, December 11 2025 | 04:21:17 PM
Breaking News

पंतप्रधानांनी कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले

Connect us on:

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण केले. ही वास्तू म्हणजे जनसेवेप्रति अतूट निर्धार आणि अथक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्तव्य भवनामुळे धोरणे आणि योजना जलदगतीने लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होण्यासोबतच, देशाच्या विकासाला एक नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्तव्य भवन हे विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याप्रति  आपल्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज देशाने हे भवन साकारणाऱ्या आपल्या श्रमयोगींच्या अथक मेहनतीचा आणि दृढनिश्चयाचा अनुभव घेतला आहे असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी या श्रमयोगींशी संवादही साधला आणि आनंदही व्यक्त केला.

पर्यावरण संरक्षणावर पूर्ण भर देऊनच या वास्तूचा विकास करण्यात आला असल्याची बाबही पंतप्रधानांनी नमूद केली .

या निमित्ताने, पंतप्रधानांनी कर्तव्य भवनाच्या आवारात एक रोपटेही लावले.

या संदर्भात X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये  पंतप्रधानांनी म्हटले आहे  :

कर्तव्य पथावरील कर्तव्य भवन हे जनतेच्या सेवेप्रती आपल्या अतूट संकल्पाचे आणि अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. यामुळे केवळ आपली धोरणे आणि योजना लोकांपर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठीच मदत होणार नाही, तर यामुळे देशाच्या विकासालाही एक नवी गती मिळेल. अत्याधुनिक पायाभूत सुविधांचे  उदाहरण ठरलेले हे भवन राष्ट्राला समर्पित करताना मला खूप अभिमान वाटत आहे.

कर्तव्य भवनाच्या उभारणीत पर्यावरण संरक्षणाची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, ज्यासाठी आपला देश वचनबद्ध आहे. आज या भवनाच्या आवारात एक रोपटे लावण्याची संधीही मला मिळाली.

About Matribhumi Samachar

Check Also

भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम

पुणे, 10 डिसेंबर 2025 भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज …