Tuesday, December 09 2025 | 10:03:15 PM
Breaking News

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांची भेट घेणार

Connect us on:

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री  मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक आणि वांशिक संबंध आहेत. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट/शेजारी राष्ट्र प्रथम’ धोरणामध्ये मालदीवचे विशेष स्थान आहे. याचा उद्देश हिंद महासागर क्षेत्रात (IOR) स्थिरता आणि समृद्धी आणणे हा आहे. तसेच, दोन्ही राष्ट्रे IOR चे संरक्षण आणि सुरक्षितता राखण्यात प्रमुख भागीदार आहेत. या माध्यमाने भारताच्या दृष्टीकोणानुसार  सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR) यात दोन्ही देश योगदान देत आहे. मालदीवचे संरक्षण मंत्री 08 ते 10 जानेवारी 2025 या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान ते गोवा आणि मुंबईलाही भेट देणार आहेत.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

भारत-ब्रुनेई दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 भारत-ब्रुनेई दरम्यानची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यामधील महत्वाचा टप्पा म्हणून नवी …