Thursday, January 15 2026 | 07:53:50 PM
Breaking News

यार्ड 132 चे समावेशन (LSAM 22)

Connect us on:

आठवा ॲम्युनिशन अर्थात  दारूगोळा कम टॉरपीडो अर्थात पाणतीर कम मिसाईल अर्थात क्षेपणास्त्र  युक्त बार्ज (ACTCM/एसीटीसीएम) , LSAM 22 (यार्ड 132) चा  नौदलात समावेश समारंभ काल अर्थात 06 जानेवारी 25 रोजी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीएमडीई विनय व्यंकटराम, प्रभारी अधिकारी, फ्लीट मेंटेनन्स युनिट (Mbi) होते.

अकरा एसीटीसीएम  बार्जेसचे बांधकाम आणि वितरणाचा करार मेसर्स सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे आणि MSME शिपयार्ड यांच्या दरम्यान   05 मार्च 21 रोजी संपन्न झाला. या करारानुसार सात एसीटीसीएम बार्जेस आधीच वितरित केल्या गेल्या आहेत आणि शिपयार्डला भारतीय नौदलाला चार सलेज बार्जचे बांधकाम आणि वितरणाचे कंत्राट देखील देण्यात आले आहे. या माध्यामातून सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदलाची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

शिपयार्डने भारतीय शिप डिझायनिंग फर्मच्या सहकार्याने या बार्जेसची स्वदेशी रचना केली आहे आणि त्यानंतर समुद्रातील वावरासाठी योग्यता सुनिश्चित करण्यासाठी नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम येथे मॉडेलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे बार्ज संबंधित नौदल नियम आणि इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) च्या नियमांनुसार बांधले गेले आहेत. हे बार्जेस भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भार उपक्रमांचे अभिमानास्पद ध्वजधारक ठरले आहेत.

या बार्जेसच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या जेटींसह बाह्य बंदरांवर भारतीय नौदलाच्या प्लॅटफॉर्मवर वाहतूक, माल उतरवणे आणि वस्तू/ दारुगोळा उतरवणे सुलभ होऊन भारतीय नौदलाच्या कार्यान्वयनाच्या वचनबद्धतेला चालना मिळणार आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …