Tuesday, January 27 2026 | 08:15:19 AM
Breaking News

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री करणार इंडसफूड 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन

Connect us on:

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, चिराग पासवान, उद्या अर्थात 8 जानेवारी 2025 रोजी इंडिया एक्सपोझिशन मार्ट लिमिटेड, गौतम बुद्ध नगर, ग्रेटर नोएडा येथे इंडसफूड 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन करतील.  इंडसफूड हे भारत सरकारच्या वाणिज्य विभागाच्या सहकार्याने ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेले आशियातील प्रमुख वार्षिक F&B व्यापार (अन्न आणि पेय (F&B) व्यापार प्रदर्शन) प्रदर्शन आहे. यंदा 2025 हे प्रदर्शन  एकात्मिक फार्म-टू-फोर्क ट्रेड शो म्हणून त्याचे पदार्पण करत असल्याने ते या क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. इंडसफूड 2025 या आवृत्तीत 120,000 चौरस मीटर पेक्षा जास्त प्रदर्शन क्षेत्रासह 30 हून अधिक देशांतील 2,300 प्रदर्शकांसाठी/ सहभागींसाठी प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. हा एकात्मिक व्यापार मेळा 7,500 हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि 15,000 भारतीय खरेदीदार/व्यापार अभ्यागतांसाठी यजमानपद भूषावणार आहे

 8 ते 10 जानेवारी दरम्यान इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे इंडसफूड F&B व्यापार मेळाव्याच्या 8 व्या आवृत्तीव्यतिरिक्त, TPCI इंडसफूड उत्पादनाच्या चौथ्या आवृत्तीचे देखील आयोजन करत आहे. या आवृत्ती मध्ये अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, पॅकेजिंग तंत्रज्ञान, घटक आणि आदरातिथ्य तंत्रज्ञान  तसेच  इंडसफूड ॲग्रीटेकच्या उद्घाटन आवृत्तीतिल कृषी तंत्रज्ञान, मत्स्यपालन तंत्रज्ञान, डेअरी आणि कुक्कुटपालन तंत्रज्ञान यांचा समावेश असणार आहे. नंतरचे दोन कार्यक्रम 9 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान यशोभूमी द्वारका, नवी दिल्ली येथे होणार आहेत.

इंडसफूड 2025 चे संपूर्ण नियोजन या तीन समवर्ती व्यापार मेळ्यांसह, फार्म-टू-फोर्क व्हॅल्यू चेनमध्ये अखंड परस्पर क्षमता वृद्धीसाठी काळजीपूर्वक करण्यात आले आहे.

2025 च्या आवृत्तीत दिल्ली NCR मधील व्यावसायिकांसह 35 आंतरराष्ट्रीय शेफ आणि 100 भारतीय प्रतिनिधींचा सहभाग असेल.

इंडियन फेडरेशन ऑफ कलिनरी असोसिएशन (IFCA) च्या भागीदारीत भारतात प्रथमच प्रतिष्ठित एशिया प्रेसिडेंट्स फोरमचे आयोजन करणे इंडसफूड 2025 साठी अभिमानास्पद आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम संपूर्ण आशियातील राष्ट्रीय शेफ/पाककलातज्ञांना असोसिएशनच्या 30 हून अधिक अध्यक्षांना एकत्र आणेल. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अन्न उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी दोन महत्वाच्या शिखर परिषदा देखील आयोजिण्यात येणार आहे.

शोमध्ये बोलताना टीपीसीआयचे अध्यक्ष मोहित सिंगला, म्हणाल की  “इंडसफूड हे शेतकरी, तंत्रज्ञान पुरवठादार आणि जागतिक बाजारपेठांमधील अंतर भरून काढण्यासाठी व्यासपीठ आहे. या माध्यामातून  केवळ व्यापाराच्या संधीच वाढत नाही तर चांगल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करून थेट शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते आणि मूल्यवर्धनाच्या संधी प्राप्त होतात असे ते म्हणाले.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …