Tuesday, December 09 2025 | 05:33:18 AM
Breaking News

श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

Connect us on:

श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे समर्पित रामभक्त अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :

“भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्थ संस्थेचे विश्वस्थ कामेश्वर चौपाल यांच्या निधनाने दु:ख झाले आहे.  अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. ते प्रखर रामभक्त होते.दलित पार्श्वभूमीतून आलेले कामेश्वर जी हे समाजातील  वंचित समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या त्यांच्या कार्यासाठी नेहमीच स्मरणात राहतील.  या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना.  ओम शांती!”

About Matribhumi Samachar

Check Also

भारताकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेच्या आरंभापूर्वी उलट्या गणतीला सुरुवात

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025 येत्या 17 ते 19 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत …