Wednesday, January 07 2026 | 06:11:13 AM
Breaking News

भारताला नक्षल मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : अमित शाह

Connect us on:

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नक्षल विरोधी कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि या कारवाईमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारताला नक्षलवादाच्या संकटापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “नुकत्याच झालेल्या नक्षल-विरोधी अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याअभियानामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ज्या शूर जवानांनी अत्यंत धैर्याने या मोहिमा यशस्वी केल्या त्यांची भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे आणि लवकरच त्यांना भेटायला मी छत्तीसगड येथे जाणार आहे. भारताला नक्षलवादाच्या संकटापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.”

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री शाह यांच्या नेतृत्वाखाली, संरक्षण दले छत्तीसगडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमा राबवत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून 18 मे 2025 ते 21 मे 2025 या कालावधीत छत्तीसगड पोलिसांनी (नारायणपूर, दंतेवाडा,कोंडगाव आणि बिजापूर जिल्ह्यांतील डीआरजी पथकांसह) अबुझमाडच्या अंतर्गत भागात शोधमोहीम राबवली. दिनांक 21 मे 2025 रोजी बोटेर गावाजवळील जंगलात झालेल्या चकमकीत सीपीआय (माओवादी)चा सरचिटणीस आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य बसवराजू उर्फ गगण्णा याच्यासह 27 नक्षली  ठार झाले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.

IMG_5101.JPG

या मोहिमेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

IMG_5113.JPG

IMG_5115.JPG

IMG_5111.JPG

IMG_5110.JPG

IMG_5107.JPG

IMG_5105.JPG

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …