नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि केंद्रीय संरक्षण व्यवहार विभाग सचिव जनरल अनिल चौहान यांनी आज 07 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित दल प्रमुखांच्या समितीच्या बैठकीत सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांच्या संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या जारी केल्या. या तत्वप्रणालींचे अवर्गीकरण युध्द लढण्याच्या संयुक्त संकल्पनांची वाढीव दृश्यमानता, पोहोच आणि विस्तृत प्रसार याप्रती भारताची बांधिलकी अधोरेखित करते.
4T38.jpeg)
आक्रमक तसेच बचावात्मक सायबर क्षमतांचे एकत्रीकरण करत आणि देशाच्या तिन्ही सेनादलांच्या समन्वयित कारवाई शक्य करत सायबरविश्वाशी संबंधित कारवाई साठीची ही संयुक्त तत्वप्रणाली राष्ट्रीय सायबरविश्वाच्या हिताचे संरक्षण करण्याप्रती एकात्मिक दृष्टीकोन निश्चित करते. ही तत्वप्रणाली धोक्याच्या माहितीवर आधारित नियोजन, लवचिकता उभारणी, वास्तविक वेळी गुप्त माहितीचे एकत्रीकरण तसेच संयुक्त सायबर क्षमतांचा विकास यावर अधिक भर देते.
तिन्ही सेनादलांच्या एकत्रित अभियानांसाठीची संयुक्त तत्वप्रणाली सागरी, हवाई आणि लष्करी सैन्यदलांच्या एकत्रीकरणाद्वारे संयुक्त अभियानांचे नियोजन तसेच अंमलबजावणीसाठीची चौकट निश्चित करते. ही तत्वप्रणाली किनाऱ्यावरील कारवाईवर प्रभाव पाडण्यासाठी आंतरपरिचालन क्षमता, त्वरित प्रतिसाद क्षमता आणि संयुक्त सेनांच्या कार्यप्रणालीवर अधिक भर देते.
Q4U8.jpeg)
सीडीएस अनिल चौहान यांनी लष्करी अवकाश मोहिमा, विशेष दलांच्या मोहिमा, हवाई/हेलीबॉर्न कारवाई, एकात्मिक लॉजिस्टिक्स, बहु क्षेत्रीय मोहिमा यांसारख्या युध्द लढण्याच्या समकालीन आणि विशिष्ट क्षेत्रांसाठी अनेकानेक नव्या तत्वप्रणाली/अध्ययन पुस्तिकांच्या विकासाचे कार्य सुरु केले आहे. या तत्वप्रणालींमुळे या क्षेत्रातील भागधारक आणि धोरण कर्त्यांना संयुक्त लष्करी कारवाई साठी परिणामकारक नियोजन आणि सुरळीत अंमलबजावणी यासाठी सामायिक शब्द प्रणाली तसेच मार्गदर्शक तत्वे उपलब्ध होतील. संयुक्त तत्वप्रणाली https://ids.nic.in/content/doctrines येथे मिळवता येईल.
Matribhumi Samachar Marathi

