Monday, January 05 2026 | 01:34:26 PM
Breaking News

युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी ओदिशातील आकांक्षी जिल्हा ढेंकनालला भेट देऊन विकासकामांचा घेतला आढावा

Connect us on:

मुंबई, 8 जानेवारी 2025

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी भारत सरकारच्या प्रमुख आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाचा (ADP) भाग म्हणून, 7 जानेवारी 2025 (मंगळवार) रोजी ओदिशातील ढेंकनाल जिल्ह्याला भेट दिली. हा कार्यक्रम सहकारिता-संघवादाच्या भावनेने राज्यांना मुख्य प्रेरक मानून, प्रत्येक जिल्ह्याच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो, तत्काळ सुधारणा आवश्यक असणारे क्षेत्र सुनिश्चित करतो आणि प्रगतीचा आढावा घेतो.

राज्यमंत्री खडसे यांनी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेश आणि कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या पाच व्यापक सामाजिक-आर्थिक संकल्पने अंतर्गत 49 प्रमुख कामगिरी निर्देशकांमध्ये (KPIs) केलेल्या वाढीव प्रगतीचा आढावा देखील घेतला.

खडसे यांनी काही प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट दिली तर, कामाख्यानगर येथील सारंगधर हायस्कूलमधील डिजिटल वाचन कक्ष, पंतप्रधान जनमन गृहनिर्माण प्रकल्प, मनरेगाची स्थिती, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता प्रकल्प, सामुदायिक गुंतवणूक निधीचा वापर आणि आयुष्मान भारत अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा, स्मार्ट क्लासरूम, ई-लायब्ररी, स्मार्ट बोर्ड यासह विविध चालू प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

केंद्रीय मंत्र्यांनी फलोत्पादन क्षेत्रात विशेषत: आंबा आणि मशरूम उत्पादन तसेच विदेशी फळांच्या लागवडीमध्ये केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.  98% शाळांमध्ये आता नळाच्या पाण्याची जोडणी आहे याची तरतूद केल्याबद्दल त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांचे कौतुक केले.  याशिवाय, आदिवासींचे विशेषत: वंचित आदिवासी गट (PTVG) कुटुंबांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला.  या उपक्रमांच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी मंत्र्यांनी जिल्ह्यातील अधिकारी आणि स्थानिक समुदायांशी संवाद साधला.

या दौऱ्यात खडसे यांच्याबरोबर ढेंकनालचे खासदार रुद्र नारायण पाणि, ढेंकनालचे जिल्हाधिकारी सोमेश उपाध्याय यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारीही उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह तेलंगणामध्ये स्मार्ट हरित मत्स्यपालन फार्म आणि संशोधन संस्था तसेच अत्याधुनिक री-सर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम (आरएएस) सुविधेचे उद्घाटन करणार

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचे मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …