Monday, December 08 2025 | 03:00:45 PM
Breaking News

डीआरडीओने 10 उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित

Connect us on:

सरकारच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागासह सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्याच्या दृष्टिकोनानुसार, महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे स्थित डीआरडीओची प्रयोगशाळा वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीइ) नऊ प्रणालींच्या तंत्रज्ञानाचे 10 उद्योगांना हस्तांतरण करत  एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे परवाना करार 7 जून 2025 रोजी व्हीआरडीई येथे आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

उद्योगांना हस्तांतरित करण्यात आलेले तंत्रज्ञान खालीलप्रमाणे आहे:

अनुक्रमांक उत्पादने / तंत्रज्ञान उद्योग भागीदार
1 सीबीआरएन (रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी, अणु) टोही वाहन (ट्रैक्ड ) एमके -II भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
2 स्थापित तोफा प्रणाली भारत फोर्ज लिमिटेड
3 दहशतवाद विरोधी वाहन – ट्रैक्ड आवृत्ती मेटलटेक मोटर बॉडी प्रायव्हेट लिमिटेड
4 मुख्य रणगाडा अर्जुन एमके – 1 ए साठी 70 टन क्षमतेचा परिपूर्ण ट्रेलर बीइएमएल लिमिटेड,

टाटा इंटरनॅशनल व्हेइकल अॅप्लीकेशन,

एसडीआर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड,

जॉन गाल्ट इंटरनॅशनल

 

5 विस्तार- योग्य फिरता निवारा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
6 वज्र – दंगली प्रतिबंधक वाहन टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड
7 एमबीटी अर्जुन साठी युनिट देखभाल वाहन बीइएमएल लिमिटेड
8 एमबीटी अर्जुनसाठी युनिट दुरुस्ती वाहन बीइएमएल लिमिटेड
9 बहुउद्देशीय निर्जंतुकीकरण प्रणाली दास हिटाची लिमिटेड, गोमा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड

तसेच, व्हीआरडीईने पुण्यातील सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधनासाठी सामंजस्य करार केला आहे.

या प्रसंगी बोलताना डॉ. कामत यांनी  “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान स्वदेशी प्रणालींच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डीआरडीओ आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले. तसेच, उद्योगांनी भविष्यकालीन वाढीच्या क्षमतेसाठी आधीच नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भूमी आधारित प्रणाली व शस्त्र मंचासाठी उच्च दर्जाचे तांत्रिक उपाय प्रदान करण्यासाठी व्हीआरडीईच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

या कार्यक्रमास डीआरडीओचे प्रमुख वैज्ञानिक व शस्त्रसज्जता व युद्ध अभियांत्रिकी गटाचे महासंचालक प्रा. (डॉ.) प्रतीक किशोर, व्हीआरडीईचे संचालक जी. राममोहन राव आणि इतर वरिष्ठ वैज्ञानिक तसेच उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

विमान सेवा जलद गतीने पूर्ववत करणे आणि प्रवासी सुविधा उपाययोजना

वर्तमान कार्यस्थिती इंडिगो सेवा व्यत्ययामुळे निर्माण झालेली कोंडी  दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सततची …