Sunday, January 04 2026 | 08:13:20 PM
Breaking News

आज नारी शक्ती विकसित भारताच्या संकल्पात सक्रियपणे सहभागी होत विविध क्षेत्रांमध्ये उदाहरणे निर्माण करत आहे: पंतप्रधान

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर सरकारचे लक्ष अधोरेखित करून विकसित भारताच्या प्रवासात महिलांनी बजावलेल्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज, त्या केवळ विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात सक्रिय भागच घेत नाहीत, तर शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवीन मानदंडही प्रस्थापित करत आहेत. मागील 11 वर्षांत, आपल्या नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे, असेही  मोदी यांनी सांगितले.

एनडीए सरकारने प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून  महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.   स्वच्छ भारत अभियानाद्वारे सन्मानाची खात्री देणे, जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेश आणि तळागाळातील सक्षमीकरण यांचा समावेश आहे. उज्ज्वला योजनेचे उदाहरण देत  त्यांनी अनेक घरांमध्ये धुरमुक्त स्वयंपाकघरे आणणारा एक मैलाचा दगड म्हणून उल्लेख केला. मुद्रा कर्ज योजनेमुळे लाखो महिला उद्योजक झाल्या असून, त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकल्या आहेत,  हे देखील त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घरे देण्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि सक्षमीकरणाच्या भावनेवर उल्लेखनीय परिणाम झाला आहे.

पंतप्रधानांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची आठवण काढत ही चळवळ मुलींच्या संरक्षणासाठी एक राष्ट्रीय चळवळ असल्याचा उल्लेख  केला.

मोदी म्हणाले की,  विज्ञान, शिक्षण, खेळ, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दलांसह सर्व क्षेत्रांमध्ये महिला उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि अनेकांना प्रेरणा देत आहेत.

पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमांवरील पोस्ट मालिकेद्वारे टिप्पण केले की ,

“आपल्या माता, बहिणी आणि मुलींनी असे काही दिवस  पाहिले आहेत, त्यावेळी त्यांना प्रत्येक पावलावर अडचणींना तोंड द्यावे लागायचे.  परंतु, आज त्या केवळ विकसित भारताच्या संकल्पात सक्रियपणे सहभागीच होत नाहीत तर शिक्षणापासून व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रात उदाहरणे देखील निर्माण करत आहेत.  गेल्या 11 वर्षात नारी शक्तीचे यश सर्व नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे.

गेल्या 11 वर्षांत, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केली आहे.

स्वच्छ भारतातून प्रतिष्ठा निश्चित  करण्यापासून ते जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेशापर्यंत विविध उपक्रम, आपल्या नारीशक्तीला सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. उज्ज्वला योजनेने अनेक घरांमध्ये धूरमुक्त स्वयंपाकघर आणले. मुद्रा कर्जामुळे लाखो महिला उद्योजकांना त्यांची  स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महिलांच्या नावे घरे दिल्यामुळे सशक्तीकरणात लक्षणीय परिणाम झाला. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेने मुलींच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप घेतले. विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिला यशस्वी होत आहेत आणि इतरांना प्रेरणा देत आहेत.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष मंत्रालयाच्या वतीने नवव्या सिद्ध दिन सोहळ्यानिमित्त उद्या चेन्नई इथं कार्यक्रमाचे आयोजन, सहा जानेवारीला राष्ट्रीय सिद्ध दिन साजरा केला जाणार

केंद्रीय आयुष मंत्रालय, राष्ट्रीय सिद्ध संस्था आणि सिद्ध संशोधनासाठी केंद्रीय परिषद या आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने, तसेच …