नवी दिल्ली, 8 जुलै 2025. पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्त विभागाने अशा वृत्तांचे खंडन करत, स्पष्ट केले आहे, की अशा प्रकारचे कोणतेही निर्देश बँकांना देण्यात आलेले नाहीत. पीएम जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशाने 1 जुलैपासून देशभरात तीन महिन्यांची विशेष मोहीम राबवण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत, बँकांकडून संबंधित खात्यांचे पुनर्केवायसी (re-KYC) प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे. वित्त सेवा विभाग नियमितपणे निष्क्रिय जनधन खात्यांची संख्या तपासत असतो आणि बँकांना अशा खातेधारकांशी संपर्क साधून ती खाती पुन्हा सक्रिय करण्याचा सल्ला देण्यात येतो. पीएम जनधन योजनेतील खात्यांची एकूण संख्या सातत्याने वाढती आहे आणि निष्क्रिय खाती मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आल्याची कोणतीही घटना विभागाच्या निदर्शनास आलेली नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
Tags PM Jan Dhan Yojana
Check Also
ॲक्सिस बँकेने वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधांसह ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले
ग्राहकांना रिअल-टाइममध्ये पूर्णतः नियंत्रित करता येणाऱ्या सुरक्षा सुविधांद्वारे सक्षम करते एसएमएस शिल्ड : बँकेकडून येणाऱ्या …
Matribhumi Samachar Marathi

