मुंबई, 8 जुलै 2025. करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि उद्योगांबरोबरचे संबंध मजबूत करण्यासाठी, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क ठाणे आयुक्तालयाने 7 जुलै 2025 रोजी जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, सीजीएसटी आणि ठाण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांनी आयुक्तालयाच्या जीएसटी संकलनाच्या कामगिरीची थोडक्यात माहिती दिली आणि महसूल संकलनात सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल व्यापारी प्रतिनिधींचे आभार मानले.

या संवादात्मक सत्रादरम्यान, व्यापारी संघटनांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यावर योग्य कार्यवाहीसाठी आयुक्तांनी या मुद्द्यांची दखल घेतली. यावेळी एफआयआयचे अध्यक्ष भालचंद्रसिंह रावराणे, टीएसएसआयएचे अध्यक्ष संदीप पारीख, टीएसएसआयए च्या माजी अध्यक्ष सुजाता सोपारकर आणि केएएमए चे खजीनदार मनोज जालान हे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली, आणि कर प्रशासन आणि भागधारकांमधील प्रभावी संवादासाठी अशा संवादात्मक सत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आयुक्तालयाला वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली, ही सूचना आयुक्त सीजीएसटी आणि ठाणे उत्पादन शुल्क यांनी सकारात्मकरित्या स्वीकारली.
Matribhumi Samachar Marathi

