पुणे/बारामती, 8 जुलै 2025. सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) तर्फे Agricultural Development Trust (ADT), बारामती यांच्या सहकार्याने एक दिवसीय युवा सहकारी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकारी चळवळीचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांना सहकारी विकास प्रक्रियेतील सक्रीय सहभागासाठी प्रेरित करणे हा होता. या कार्यक्रमामध्ये कृषी, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, नर्सिंग आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधील ७१५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी प्रो. शंतनु घोष, कुलसचिव, VAMNICOM यांनी सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमागील दूरदृष्टी, ग्रामीण विकासामधील सहकाराचे योगदान आणि तरुणांनी सहकार चळवळीमध्ये घेतलेली भूमिका अधोरेखित केली. त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत युवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

VAMNICOM, सहकार मंत्रालयाअंतर्गत एक राष्ट्रीय संस्था असून, सहकारी क्षेत्रातील प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन व सल्लागार सेवा पुरवण्यात ही संस्था अग्रगण्य आहे. भारत आणि दक्षिण आशियामध्ये सहकारी मानवसंपदा विकासात या संस्थेचे मोलाचे योगदान आहे.

Agricultural Development Trust, बारामती ही संस्था ग्रामीण आणि कृषी विकास क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असून, शैक्षणिक आणि सहकारी उपक्रम यांचा संगम घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सहकारी उद्योजकता, धोरण उपक्रम, आणि तरुणांसाठी संस्थात्मक संधी या विषयांवर चर्चासत्र झाले.

Matribhumi Samachar Marathi

