Friday, January 02 2026 | 03:56:17 AM
Breaking News

मेटल-जी च्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारत समाविष्ट

Connect us on:

मुंबई, 8 डिसेंबर 2025

अधिक स्वच्छ, अधिक हरित भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, जड पाणी  मंडळाने (एचडब्ल्यूबी) भाभा अणुउर्जा संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहयोगासह, आयन-एक्स्चेंज (IX) प्रक्रियेवर आधारित अल्युमिना शुद्धीकरण केंद्रातील स्पेंट लिकरपासून मौल्यवान धातूंच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रात्यक्षिक संयंत्राचे बांधकाम सुरु केले आहे. हा ओदिशामध्ये दमनजोदी येथील नाल्कोस्थित अग्रणी प्रकल्प म्हणजे सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या दिशेने स्थित्यंतर घडवण्यासाठी भारतातर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधील एम महत्त्वाचा टप्पा आहे.

ओदिशामध्ये दमनजोदी येथील नाल्को शुद्धीकरण केंद्रात 20 नोव्हेंबर, 2025 रोजी जड पाणी  मंडळाचे (एचडब्ल्यूबी) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस.सत्यकुमार आणि नाल्कोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते भूमीपूजन कार्यक्रम झाला. याप्रसंगी बीएआरसीचे साहित्य गट संचालक डॉ.राघवेंद्र तिवारी, नाल्कोच्या (पी आणि टी विभागाचे)संचालक जगदीश अरोरा यांच्यासह बीएआरसी, एचडब्ल्यूबी तसेच नाल्को या संस्थांमध्ये कार्यरत अनेक सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या.

एस.सत्यकुमार यांनी याप्रसंगी सांगितले की या अशा पद्धतीच्या प्रथमच उभारण्यात आलेल्या सुविधेद्वारे स्पेंट लिकरपासून मेटल-जी मिळवण्यात स्वदेशी पद्धतीने विकसित विशेष रेझिन आणि सॉल्व्हंटची क्षमता दिसून येते. नाल्कोमधील स्पेंट लिकरपासून मेटल-जी मिळवून आपण आपल्या देशातील सेमीकंडक्टर विषयक गरज भागवण्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करत आहोत.

अत्यंत कमी द्रवीभवन बिंदू आणि अत्यंत उच्च उत्कलन बिंदू असलेल्या मेटल-जी चे उच्च-वेगवान सेमीकंडक्टरसाठीच्या इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये आणि अवकाश तसेच संरक्षण क्षेत्रातील वापराच्या साधनांतील एकात्मिक मंडलात (आयसीज) अनेक उपयोग आहेत. आत्मनिर्भर भारताच्या राष्ट्रील संकल्पनेला अनुसरून, हा प्रायोगिक तत्वावरील कारखाना मेटल-जी उत्पादनासाठी पर्यावरण-स्नेही, स्केलेबल उपाय उपलब्ध करून देण्यात प्रगती साध्य करतो.

या महत्त्वाकांक्षी प्रदर्शन संयंत्रामुळे, मेटल-जी च्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

नोव्हेंबर 2025 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा त्वरित अंदाज आणि वापर आधारित निर्देशांक जाहीर (पायाभूत वर्ष 2011-12=100)

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. ​उत्पादन क्षेत्रातील 8.0 टक्के वाढीमुळे, नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने …