Tuesday, January 20 2026 | 03:18:45 PM
Breaking News

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या 8 व्या आवृत्तीत विक्रमी सहभाग

Connect us on:

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा उपक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC), परीक्षेशी संबंधित तणावाच्या व्यवस्थापनाचे शिक्षण आणि परिक्षेचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी देशव्यापी चळवळ म्हणून निरंतर प्रगती करत  आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 च्या 8 व्या आवृत्तीत भारतातून आणि परदेशातून 2.79 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या नोंदणीसह  या कार्यक्रमाने  एक अभूतपूर्व टप्पा गाठला आहे. सहभागींचा हा उत्स्फूर्त  प्रतिसाद खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची जनआंदोलन म्हणून वाढती लोकप्रियता प्रदर्शित करतो.

MyGov.in या पोर्टलवर ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 साठी ऑनलाइन नोंदणी 14 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाली असून 14 जानेवारी 2025 पर्यंत खुली राहणार आहे. कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यात  आणि परीक्षांच्या दिशेने सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यात या उपक्रमाला मिळालेले यश दर्शवते.

शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा संवादात्मक कार्यक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ हा शिक्षण क्षेत्राचा बहुप्रतीक्षित उत्सव बनला आहे.  2024 मधील ‘परीक्षा पे चर्चा’ ची 7 वी आवृत्ती नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरच्या भारत मंडपम येथे टाऊन हॉल प्रारूपात आयोजित करण्यात आली होती आणि याची व्यापक प्रशंसा करण्यात आली होती.

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाच्या अनुषंगाने, 12 जानेवारी 2025 (राष्ट्रीय युवा दिन) ते 23 जानेवारी 2025 (नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती) पर्यंत शालेय स्तरावरील अनेक आकर्षक उपक्रमांचे आयोजन  केले आहे. सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन  देणे तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा उत्सवाच्या रूपाने साजरे करण्यासाठी प्रेरित करणे हा उपक्रमांचा उद्देश आहे. हे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:

  • स्वदेशी खेळांच्या स्पर्धा
  • मॅरेथॉन दौड
  • मिम्स स्पर्धा
  • नुक्कड नाटक (पथनाट्य)
  • योग आणि ध्यानधारणा  सत्रे
  • भित्तीचित्रे स्पर्धा
  • प्रेरणादायी चित्रपटांचे प्रदर्शन
  • मानसिक आरोग्य कार्यशाळा आणि समुपदेशन सत्रे
  • कविता / गाणे / कलाविष्कार सादरीकरण

या उपक्रमांद्वारे, ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 उपक्रम शिकण्यातील लवचिकता, सकारात्मकता आणि आनंद या संदेशाला बळकटी देतो, तसेच शिक्षण हे ताण घेऊन करण्याचे काम न ठरता एक प्रवास म्हणून साजरे केले जाईल याची खात्री करतो.

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आणि सहभागासाठी, MyGov.in ला संकेतस्थळाला भेट द्या आणि या परिवर्तनीय उपक्रमाचा एक भाग व्हा.

About Matribhumi Samachar

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे चेन्नईतील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात मार्गदर्शन

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान …