Wednesday, January 07 2026 | 03:36:11 PM
Breaking News

भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

Connect us on:

मुंबई, 9 जुलै 2025

मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक विभागा (बीआयएस) च्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 जुलै 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या जागेवर छापा घातला. पालघर जिल्ह्यातील विरारमधीलबोळींज स्थित एम/एस पटेल टिंबर ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्याकडे बनावट/रद्द केलेले/कालबाह्य झालेले बीआयएस परवाना क्रमांक असलेले प्लायवूड साठवले आणि  विकले जात असल्याचे उघड झाले.

बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) आणि (3) चे हे उल्लंघन असून त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान रु. 2,00,000 दंड किंवा या दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

बीआयएस कायदा 2016 नुसार – कोणतीही व्यक्ती बीआयएसकडून कायदेशीर परवाना घेतल्याशिवाय कोणत्याही वस्तू, वस्तूंची निर्मिती, वितरण, विक्री, भाड्याने देणे, लीजवर देणे, प्रदर्शन, विक्रीसाठी ऑफर, प्रक्रिया, प्रणाली किंवा सेवा यासाठी किंवा कोणत्याही पेटंटच्या शीर्षकात, ट्रेड मार्क अथवा डिझाईनमध्ये मानक चिन्ह किंवा त्याची हुबेहुब नक्कल वापरू शकत नाही. परवानाधारक, विक्रेता इत्यादींच्या जबाबदाऱ्या आणि शिक्षा यासाठी बीआयएस कायदा 2016 पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बीआयएस ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था असून ती बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. सर्व ग्राहकांनी मोबाईल ॲण्ड्रॉईड व आयओएस या दोन्हीसाठी उपलब्ध असलेल्या बीआयएस केअर ॲपचा वापर करण्यासाठी ही संस्था प्रोत्साहन देते. तसेच, बीआयएसप्रमाणित असणे आवश्यक असलेल्या उत्पादनांची यादी, कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील आयएसआय मानक चिन्ह खरे आहे की नाही हे बीआयएसच्या http://www.bis.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासावे, असे आवाहन बीआयएसने केले आहे. तसेच, कुठेही बीआयएसप्रमाणपत्र आवश्यक असलेली उत्पादने प्रमाणपत्राशिवाय विकली जात असतील किंवा कुठल्याही उत्पादनावर आयएसआय मानकाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन बीआयएसने सर्व नागरिकांना केले आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

रिलॅक्सो फूटवेअरने स्प्रिंग समर २०२६ कलेक्शनमध्ये बोल्ड आणि रोमांचक श्रेणी केली सादर

मुंबई, महाराष्ट्र, जानेवारी 2026: भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह फूटवेअर उत्पादक कंपनी रिलॅक्सो फूटवेअर्स …