पुणे, 9 ऑगस्ट 2025. घोडेगाव (ता. आंबेगाव), पुणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एका भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव; केंद्रीय संचार ब्युरो व आदिवासी सांस्कृतिक समिती, घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
OZZR.jpeg)
सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी, रॅलीमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य, वेशभूषा प्रदर्शन, स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांचे दर्शन यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.
यानिमित्ताने आदिवासी योजनांचे लघु प्रदर्शन व मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आले. यावेळी श्री. भावरे यांनी आदिवासी योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शबरी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांमध्ये निवड झालेल्या आदिवासी युवकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील व प्रदीप देसाई या स्थानिक नेत्यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
X43T.jpeg)
Matribhumi Samachar Marathi

