Wednesday, January 07 2026 | 04:38:12 AM
Breaking News

कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक यांनी पणजी येथे त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम केला आयोजित

Connect us on:

पणजी, 10 डिसेंबर 2025

महाराष्ट्र आणि गोवा येथील कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने 10 डिसेंबर 2025 रोजी गोव्यामधील पणजी येथील संचार भवन येथे त्यांचा त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोवा येथील सीसीए डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमातील आपल्या भाषणात डॉ. झा यांनी डिजिटल इंडिया मिशनला चालना देण्यातील तसेच ग्रामीण आणि निम-शहरी भागात इंटरनेट प्रवेशाचे लोकशाहीकरण करण्यातील स्थानिक आयएसपी ऑपरेटर्सच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि परवानाधारकांना नियामक दायित्वांचे पालन करण्याचे आवाहन केले.

राज्य समन्वय गोवा येथील डीडीजी (एससी) राजीव कुमार यांनी सहभागींनी उपस्थित केलेल्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे दिली.

कार्यक्रमात वरिष्ठ लेखा अधिकारी राजेश एम के यांनी परवाना कराराच्या मूलभूत अटी आणि शर्ती, ‘सारस’ कार्यक्षमता आणि बँक हमी यावर एक संक्षिप्त सादरीकरण केले.

दूरसंचार संवाद कार्यक्रमात गोवा आणि जवळच्या सेकंडरी स्विचिंग एरिया (एस एस ए) मधील 52 परवानाधारकांचा समावेश होता. या कार्यक्रमात परवाना शुल्क वेळेवर भरणे, तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षण केलेले आर्थिक दस्तऐवज सादर करणे, बँक हमींचे नूतनीकरण, महसूल व्यवस्थापन सॉफ्टवेअर (सारस) ची कार्यक्षमता आणि त्यावरील प्रत्यक्ष प्रशिक्षण यांचा समावेश होता. परवानाधारकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आणि त्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.

सर्व आयएसपी परवानाधारकांच्या वतीने ऑल गोवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशनचे अध्यक्ष मेर्विन ब्रिटो यांनी तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि समर्पित मार्गदर्शन दिल्याबद्दल सीसीए महाराष्ट्र आणि गोवा यांचे मनापासून आभार मानले.

About Matribhumi Samachar

Check Also

रिलॅक्सो फूटवेअरने स्प्रिंग समर २०२६ कलेक्शनमध्ये बोल्ड आणि रोमांचक श्रेणी केली सादर

मुंबई, महाराष्ट्र, जानेवारी 2026: भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह फूटवेअर उत्पादक कंपनी रिलॅक्सो फूटवेअर्स …