सोलापूर, 11 जानेवारी 2025
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि विवेकानंद केंद्र, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 12 ते 14 जानेवारी 2025 पर्यंत सामूहिक सूर्यनमस्कार, रक्तदान शिबिर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आणि विवेकानंद केंद्राचे नगर प्रमुख रवी कंटील यांनी दिली आहे.

दिनांक 12 जानेवारी रोजी श्री हनुमान मंदिर पटांगण, माधवनगर येथे सकाळी 6.30 ते 7.30 यावेळेत श्री मदगोंडा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी सामूहिक सूर्यनमस्काराचा अभ्यास घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी श्रुतिका दासरी-72496 63340 यांची संपर्क साधावा. दमाणी सांस्कृतिक भवन, विवेकानंद केंद्र, रेल्वे लाईन्स येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पारितोषिके वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 12 ते 14 जानेवारी पर्यंत दररोज संध्याकाळी 5 ते 9 या कालावधीमध्ये विवेकानंद यांच्या जीवनावरील आणि अन्य साहित्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि आदर्शांचा प्रचार करणे आणि त्यांचे विचार देशातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश आहे.
सदर उपक्रमात जास्तीत जास्त युवक-युवती यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.
Matribhumi Samachar Marathi

