नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते.
गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. त्यांच्या भावपूर्ण कविता जाती आणि धर्माच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण मानवतेला प्रेरणा देतात. संत रविदासजींचे जीवन समाजाच्या सर्व घटकांसाठी प्रेरणास्रोत आहे.
या प्रसंगी,आपण संत रविदासजी यांचा भक्ती, करुणा आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश आत्मसात करूया, आणि या गुणांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया, सोबतच समावेशक समाज आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीत योगदान देऊया”.
Matribhumi Samachar Marathi

