Monday, December 29 2025 | 08:51:16 PM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टोनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

Connect us on:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिसमधील एआय ॲक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती अलार कारिस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

भारत आणि एस्टोनियामधील मधुर आणि मैत्रीपूर्ण संबंध लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य तसेच बहुलवादाच्या मूल्यांप्रती त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष   कारिस यांनी अधोरेखित केले. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल, संस्कृती, पर्यटन आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात वाढत्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पंतप्रधानांनी एस्टोनिया सरकार आणि कंपन्यांना भारताच्या विकासासंबंधी संधींचा शोध घेण्यासाठी तसेच डिजिटल इंडियासारख्या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले.

दोन्ही नेत्यांनी भारत-युरोपीय संघ धोरणात्मक भागीदारीच्या संदर्भात भारत-एस्टोनिया भागीदारीचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांनी भारत-नॉर्डिक-बाल्टिक प्रारुपात  मंत्रीस्तरीय देवाणघेवाणीच्या सुरुवातीचे स्वागत केले. संयुक्त राष्ट्रांमध्ये परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आणि सहकार्यावरही दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि एस्टोनियामधील वाढत्या सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले. या संदर्भात, पंतप्रधानांनी एस्टोनियामध्ये योगाच्या लोकप्रियतेचेही कौतुक केले.

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …