मुंबई, 12 जानेवारी 2025
सैन्याच्या तिन्ही दलांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 हून अधिक निवृत्तानी आज (12 जानेवारी 2025) मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे आयोजित निवृत्त कर्मचारी दिवस परेडमध्ये भाग घेतला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एनसीपीए समोरील मैदानातून सशस्त्र दलातील निवृत्त सैनिकांच्या परेडच्या चौथ्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

या कार्यक्रमात एफओसी-इन-सी वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग आणि तिन्ही सेना दलातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. नेव्ही फाउंडेशन, मुंबई चॅप्टर (एनएफएमसी) ने वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाच्या सहकार्याने या परेडचे आयोजन केले होते.
राज्यपालांनी युद्धातील वीर, वीर नारी आणि सशस्त्र दलातील माजी सैनिकांना अभिवादन केले आणि एकता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत काही पावले चालत गेले. परेडमध्ये भाग घेतलेल्या निवृत्त सैनिकांमध्ये एनएफएमसी चे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा (निवृत्त) आणि एनएफएमसी चे माजी अध्यक्ष कॅप्टन राज मोहिंद्र (निवृत्त) वय 92 वर्षे यांचाही समावेश होता.
VJFZ.jpeg)
निवृत्त सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ,फील्ड मार्शल के एम करिअप्पा,ओबीई, जे गौरवशाली सेवेनंतर 1953 मध्ये निवृत्त झाले त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 जानेवारी रोजी तिन्ही सैन्य दलातील निवृत्त कर्मचारी दिवस साजरा केला जातो.
या परेडमध्ये लष्कराचा बँड, राष्ट्रीय छात्र सेना आणि एससीसी कॅडेट्सचाही सहभाग होता. निवृत्त सैनिकांच्या देशसेवेतील गौरवशाली योगदानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या परेडचा मुख्य उद्देश होता.

Matribhumi Samachar Marathi

