नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे मार्सिले येथे नव्याने उघडलेल्या भारतीय महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन म्हणजे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा होय.उद्घाटनप्रसंगी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन जातीने हजर राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी मनापासून कौतुक केले. महावाणिज्य दूतावासात, ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांनी उभय नेत्यांचे हार्दिक स्वागत केले.
जुलै 2023 मध्ये पंतप्रधानांच्या फ्रान्स भेटीदरम्यान मार्सिले येथे महावाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. महावाणिज्य दूतावासाचे फ्रान्सच्या दक्षिणेकडील चार फ्रेंच प्रशासकीय क्षेत्रांवर म्हणजे – प्रोव्हन्स आल्प्स कोट डी’अझूर, कॉर्सिका, ऑक्सिटानी आणि ऑव्हर्गेन-रोन-आल्प्स यावर वाणिज्य दूतावास अधिकारक्षेत्र असेल.
फ्रान्सचा हा प्रदेश व्यापार, उद्योग, ऊर्जा आणि लक्झरी पर्यटनासाठी उत्तम पर्याय असून भारताशी त्याचे महत्त्वपूर्ण आर्थिक, सांस्कृतिक आणि नागरिकांमध्ये परस्पर संबंध आहेत. फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात नवीन महावाणिज्य दूतावासामुळे बहुआयामी भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होईल.
Matribhumi Samachar Marathi

