नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आपल्या 87 व्या बैठकीत (1 मेट्रो 1 RRTS, 2 रस्ते आणि 1 हवाई प्रकल्प ) पाच प्रकल्पांचा आढावा घेतला तसेच इंटिग्रेटेड मल्टीमोडल पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक नोड्ससाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी या तत्त्वांवरच्या पीएम गतीशक्तीसाठीच्या त्यांच्या उपयुक्ततेची तपासणी केली.
या प्रकल्पामुळे मालवाहतुकीतील कार्यक्षमतेला चालना मिळेल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये लक्षणीयपणे त्याचे सामाजिक तसेच आर्थिक फायदे पोहोचतील.
उद्योजकता विकास आणि अंतर्गत व्यापार खात्याचे संयुक्त सचिव ई. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीने मेट्रो, RRTS, रस्ते आणि हवाई वाहतूक क्षेत्रात तील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला आणि पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनच्या (PMGS NMP) समन्वयानुसार मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी तसेच कार्यक्षम मालवाहतूक यांच्या विस्तारीकरणावर भर दिला.
या प्रकल्पांचे मूल्यांकन आणि अपेक्षित परिणाम खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत.
पुणे मेट्रो मार्ग 4: खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप-वारजे-माणिकबाग
पुणे मेट्रो मार्ग 4: खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला तसेच नळस्टॉप-वारजे-माणिकबाग येथून धावणाऱ्या मार्गासह.अंदाजे 31.64 कि. मी. चा हा प्रकल्प गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रस्तावित केला आहे आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने त्याची अंमलबजावणी केली आहे.
सध्याच्या डीपीआर या टप्प्यावर एकात्मिक आराखडा ज्यामध्ये कार्यान्वित मेट्रो मार्ग आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग त्याचप्रमाणे फिडर मेट्रो मार्गांमधील आंतरपरिवर्तन अंतर्भूत आहे. हे एकूणच वाहतुकीला चालना देत अपेक्षित सिमलेस मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी गाठेल.
Matribhumi Samachar Marathi

