Wednesday, January 07 2026 | 10:06:54 PM
Breaking News

भारतातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Connect us on:

युनेस्कोच्या प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देशातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला. वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या  एकूण १२ भव्य किल्ल्यांपैकी ११ महाराष्ट्रात तर १ तामिळनाडूमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

मराठा साम्राज्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, “जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा सुशासन, प्रभावशाली लष्करी क्षमता, सांस्कृतिक अभिमान आणि समाज कल्याणावरील भर यांची आठवण होते. मराठा साम्राज्यातील महान शासकांनी, अन्यायापुढे न झुकण्याचा दिलेला आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो.”

पंतप्रधानांनी देशवासीयांना हे किल्ले प्रत्यक्ष भेट देऊन मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याचे आवाहन केले. तसेच, २०१४ मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या त्यांच्या भेटीच्या आठवणीही त्यांनी शेअर केल्या, जेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले होते.

युनेस्कोच्या या घोषणेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येक भारतीयासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. या मराठा लष्करी वास्तूंमध्ये १२ भव्य किल्ल्यांचा समावेश आहे, त्यापैकी ११ महाराष्ट्रात आणि १ तामिळनाडूमध्ये आहे. जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा सुशासन, प्रभावशाली लष्करी क्षमता, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावरचा भर यांची आठवण होते. महान शासकांनी अन्यायापुढे न झुकण्याचा दिलेला आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो. मी सर्वांना या किल्ल्यांना भेट देण्याचे आणि मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घेण्याचे आवाहन करतो. २०१४ मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या माझ्या भेटीचे छायाचित्र येथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्याची संधी मिळाली. ही भेट माझ्या कायम स्मरणात राहील.”

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह तेलंगणामध्ये स्मार्ट हरित मत्स्यपालन फार्म आणि संशोधन संस्था तसेच अत्याधुनिक री-सर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम (आरएएस) सुविधेचे उद्घाटन करणार

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचे मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …