नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून देशातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, आयोगाचे सदस्य, एमएसएमई विभागाचे सचिव, संयुक्त सचिव(एआरआय), आर्थिक सल्लागार, एमएसएमई, सीईओ, केव्हीआयसी, आणि एमएसएमईचे इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी देशात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिक केंद्रित दृष्टीकोनाने प्रयत्नांची व्याप्ती वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.


भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

