भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय टपाल सेवा आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवा, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा ) आणि भारतीय टपाल सेवा निवड झालेल्या प्रशिक्षणाधिन अधिकारी गटाने आज (13 फेब्रुवारी 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
तरुण अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राद्वारे राष्ट्राच्या विकासात आणि समृद्धीमध्ये थेट योगदान देण्याची ही उत्तम संधी आहे, मग ते सार्वजनिक वित्त व्यवस्थापन करणे असो किंवा संपूर्ण देशात अखंड दळणवळण आणि संचारसेवा सुनिश्चित करणे, असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या. भारत नावीन्यपूर्ण आणि डिजिटल उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल करत असताना, आपल्यासारख्या तरुण नागरी सेवकांच्या खांद्यावर एक महत्त्वाची जबाबदारी आहे,असेही त्या पुढे म्हणाल्या.
सेवा वितरणात अधिक गती आणि कार्यक्षमतेसह पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याची जनतेची अपेक्षा सतत वाढत आहे,असे सांगत या गरजा पूर्ण करण्यासाठी, सरकारी विभागांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करून त्यांच्या प्रणालींचे आधुनिकीकरण आणि डिजिटलीकरण करणे आवश्यक आहे,असे राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले.
Matribhumi Samachar Marathi

