पुणे, 13 फेब्रुवारी 2025
भारत सरकारच्या सहकार मंत्रालयातर्फे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. कृषी बँक व्यवसायातील आंतरराष्ट्रीय सहकार व प्रशिक्षण केंद्र अर्थात The Centre for International Cooperation and Training in Agricultural Banking (CICTAB) ने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या साहाय्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. ‘सहकारी संस्थांद्वारे समृद्धी आणणे: डिजिटल इनोव्हेशन आणि मूल्य साखळी’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेचे उद्घाटन आशिया-पॅसिफिक ग्रामीण व कृषी पत संघटनेचे सरचिटणीस प्रसून कुमार दास यांच्या हस्ते व राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था व पंचायत राज, (National Institute of Rural Development and Panchayati Raj) हैद्राबादचे महासंचालक डॉ. जी. नरेंद्र कुमार (भा. प्र. से.), राष्ट्रीय सहकार संघ, भारतच्या (National Cooperative Union of India) उप मुख्य कार्यकारी अधिकारी सावित्री सिंग, आयआयएम, नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, श्रीलंका येथील SANASA International च्या व्यवस्थापकीय संचालक समादानी किरिवंदेनीय व VAMNICOM तसेच CICTAB, पुणेच्या संचालक डॉ. हेमा यादव यांच्या उपस्थितीमध्ये झाले.


2025 हे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून साजरे होत असूनपुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेमध्ये ही परिषद होत आहे.
नेपाळ, भूतान, बांग्लादेश, लाओस, कंबोडिया, गाम्बिया, केनिया, लाइबेरिया, मॉरीशियस, नामिबिया, फिलिपिन्स, श्रीलंका, झांबिया अशा 13 देशांचे 33 प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित आहेत.
56KJ.jpeg)
या तीन दिवसात सहकारी संस्थांमधील डिजिटल इनोव्हेशन, यशस्वी सहकारी संस्थाचा परिचय, मूल्य साखळीतील आव्हाने व संधी, सहकारी संस्थांतील शाश्वतता, सहकारी संस्थांद्वारा समृद्धी, जागतिक सहकारिता इत्यादी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. येत्या शनिवारी, दिनांक 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये या परिषदेचा समारोप होणार आहे.

Matribhumi Samachar Marathi

