Friday, January 02 2026 | 09:56:20 PM
Breaking News

राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे’ डॉ.मनसुख मांडविया यांनी गांधीनगर येथून केले नेतृत्व ; द ग्रेट खली ची दिल्लीतील 31व्या आवृत्तीला उपस्थिती

Connect us on:

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ या उपक्रमाची 31वी आवृत्ती यशस्वीरित्या देशभर रविवारी सकाळी पार पडली.केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया गुजरातमधील गांधीनगरमध्ये 500 हून अधिक सहभागींसोबत या मोहिमेत सहभागी झाले.

या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयूएस) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या अखिल भारतीय सायकलिंग मोहिमेत देशभरातील 7000 हून अधिक ठिकाणांहून सहभाग नोंदवण्यात आला, ज्यामुळे “फिटनेस चा डोज़, अर्धा तास रोज़” या संदेशाला अधिक बळकटी मिळाली. या उपक्रमात 3000 नमो फिट इंडिया सायकलिंग क्लब्सचे सदस्यही सक्रियपणे सहभागी झाले होते.

“‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ हा उपक्रम आता एक प्रभावी राष्ट्रीय चळवळ बनली आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मिशनला बळकटी देत आहे. ही मालिका फक्त फिटनेसपुरती मर्यादित नाही, तर ही देशपरिवर्तनाची एक चळवळदेखील बनली आहे. या उपक्रमात 7000 पेक्षा अधिक ठिकाणी आपल्या युवकांनी आज सक्रिय सहभाग घेतला आहे,” असे डॉ. मांडविया यांनी गुजरातमध्ये सांगितले.

डॉ. मांडविया यांनी गांधीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण,राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र येथे, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात असलेल्या भारतीय युवा महिला हँडबॉल संघाशी संवाद साधला.  अर्जुन पुरस्कार विजेते आणि पॅरा पॉवरलिफ्टिंगचे मुख्य प्रशिक्षक राजिंदर सिंग रहेलू यांच्या हस्ते गांधीनगर येथील या मोहिमेची  सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला आमदार, महापौर, उपमहापौर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह स्थानिक मान्यवर देखील उपस्थित होते.

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत, ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ ची 31वी आवृत्ती मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये एक सणासारख्या वातावरणात पार पडली.ज्यामध्ये दोरीची उडी, झुंबा आणि हठयोग आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर माजी डबल्यूडबल्यूई वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन आणि हे पद मिळवणारे एकमेव भारतीय द ग्रेट खली यांनी सायकल फेरीचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात 3000 पेक्षा अधिक वृद्ध व तरुण फिटनेसप्रेमींनी सहभाग घेतला. त्याचबरोबर यात 52 वर्षीय खली यांनी भारत ‘विश्वगुरू’ बनवण्यासाठी फिटनेसचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

“आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचे स्वप्न आहे, आणि ते स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण सर्वजण आरोग्यदायी आणि सशक्त असू. चला आपण सर्वजण एकत्र येऊन मोदीजींच्या या कल्पनेस बळकटी देऊ आणि प्रत्येकाला जागरूक करू. दररोज एक तास फिटनेससाठी राखून ठेवू आणि त्यानंतर उर्वरित वेळ आपल्या जीवनासाठी वापरूया,” असे खली म्हणाले.

खली, उर्फ दलिप सिंह राणा, यांनी युवांनाही “अंमली पदार्थांचे   व्यसन टाळा” आणि फिटनेस व खेळांसारख्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा असे आवाहन केले.

गुरगावमध्ये ‘राहगिरी फाउंडेशन’च्या सहकार्याने फिट इंडिया संडे ऑन सायकलचा एक विशेष आवृत्ती  देखील आयोजित करण्यात आली.ज्यामध्ये 700 सहभागी सायकलिंग, योगा तसेच विविध मजेशीर खेळांमध्ये सहभागी झाले, ज्यात स्ट्रीट डान्स, लुडो, कॅरम, सापशिडी, हस्तचित्रकला आणि बरेचसे खेळ समाविष्ट होते.

About Matribhumi Samachar

Check Also

आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन

या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे …