Sunday, January 18 2026 | 03:26:41 AM
Breaking News

सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन

Connect us on:

गोवा, 13 ऑगस्‍ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना  या सारख्या जनसुरक्षा योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि केवायसीची फेरपडताळणी करण्यासाठी आयोजित शिबिराला  प्रियोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना गावडे यांनी ग्रामस्थांना शासनाच्या विमा व पेन्शन (निवृत्ती वेतन) योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अशा प्रकारचे शिबीर आयोजित केल्यामुळे दुर्गम भागातील लोकांना सरकारी योजनांमध्ये नावनोंदणी करण्याची आणि त्यांचे केवायसी अद्ययावत करण्याची संधी मिळते, हे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे हे शिबिर आयोजित केल्याबद्दल मी एसएलबीसीची प्रशंसा करतो, असे ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक अर्णब कुमार चौधरी यांनी तळागाळापर्यंत वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वित्तीय जागरूकता वाढवण्यासाठी आरबीआय बजावत असलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी केवायसी आणि री-केवायसीचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि बँकिंग सेवांचा सुरळीत पुरवठा राहावा, यासाठी ग्रामस्थांनी त्यांचे री-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन केले. यामुळे डीबीटी हस्तांतरण ऑनलाइन मिळायला देखील मदत होईल, असे ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक प्रभाकर झा यांनी उपस्थितांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षेवरही भर दिला. त्यांनी सहभागींना बँकांमधील ग्राहक तक्रार निवारण कक्षाचा वापर करण्याची विनंती केली.

एसबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक  कार्लोस रॉड्रिग्ज यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर एसबीआयचे डीजीएम शैलेंद्र मिश्रा यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नाबार्डचे महाव्यवस्थापक संदीप धारकर, आयओबीचे प्रादेशिक प्रमुख कुणाल सिंग, जीएससीबीचे व्यवस्थापकीय संचालक  अनंत चोडणकर आणि आरबीआय आणि इतर बँकांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी योजनांसाठी नाव नोंदणी केली आणि त्यांचे री-केवायसी पूर्ण केले.

About Matribhumi Samachar

Check Also

आणि यशाचा गुलाल उधळला, कामाला जाऊन केला अभ्यास

अमरावती. एका ध्येय वेड्या युवकाने खेडेगावात राहून कठोर परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली मात्र, परीक्षा वादाच्या …