गोवा, 13 ऑगस्ट 2025. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवा आणि गोवा पोलिसांच्या कुंकळी पोलिस स्थानक यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी संयुक्तपणे, हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित ही तिरंगा रॅली एनआयटी गोवा परिसरातून कुंकळी बाजारपेठेच्या दिशेने निघाली.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोव्याचे संचालक, प्राध्यापक ओ आर जैस्वाल यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीमध्ये कुंकळी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, सुरक्षा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि कुंकळी पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, राष्ट्रीय एकता आणि देशाविषयी अभिमान वाढवण्यासाठी या सामूहिक उपक्रमाने मोठा हातभार लावला.

या मोहिमेचा एक भाग म्हणून सर्व रहिवासी आणि नागरिकांना भारताचा 79 व्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान त्यांच्या घरांवर आणि आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
Matribhumi Samachar Marathi

