Sunday, January 04 2026 | 11:16:35 AM
Breaking News

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माजी सैनिक दिनानिमित्त सम्मान मासिकाच्या महत्वपूर्ण 10 व्या आवृत्तीचे केले प्रकाशन

Connect us on:

पुणे, 14 जानेवारी 2025

लष्करप्रमुख  जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज पुण्यात आयोजित 9व्या सशस्त्र दल माजी सैनिक दिन  सोहळ्यात सम्मान  मासिकाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन केले.मासिकाची ही विशेष आवृत्ती माजी सैनिकांसाठी केवळ  एक मौल्यवान संसाधन नाही तर भारतीय लष्कर आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबामधील सामायिक चिरस्थायी बंधाचाही उत्सव आहे.

10 व्या आवृत्तीमध्ये भारतीय लष्कर माजी सैनिक संचालनालयाने  हाती घेतलेले प्रमुख  उपक्रम आहेत, ज्यात प्रोजेक्ट नमन , चॅटबोट संबंध आणि VSK+ यांचा समावेश आहे. हे उपक्रम माजी सैनिकांच्या कल्याणाप्रति भारतीय लष्कराची  अथक वचनबद्धता अधोरेखित करतात , जे  “आपल्या माणसांची  काळजी घेणे” ही मूलभूत तत्वे प्रतिबिंबित करते. हे मासिक विविध माजी सैनिक कल्याण संघटनांची अद्ययावत माहिती देखील प्रदान करते, जे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान  सुधारण्यात  केलेली  महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. या मासिकाचे प्रकाशन  संपूर्ण भारतामध्ये संबंधित ठिकाणी  माजी सैनिक दिन कार्यक्रमांमध्ये एकाच  वेळी करण्यात आले. मासिकाची ही आवृत्ती नागरी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांच्या  प्रेरणादायी यशोगाथा सर्वांसमोर आणते जे  लवचिकता, अनुकूलता आणि त्यांनी समाजाप्रति सातत्याने दिलेलं योगदान यांचे उदाहरण आहे.

सम्मान मासिक दहावा वर्धापन दिन साजरा करत असून ते भारतीय लष्कर माजी सैनिक संचालनालयाच्या विकसित भूमिकेचा आणि माजी सैनिकांचे सक्षमीकरण आणि त्यांना सहाय्य  करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमांचा दाखला  आहे. हे केवळ माजी सैनिकांचे कर्तृत्व अधोरेखित करत नाही तर भारतीय लष्कराच्या व्यापक उपक्रमांशी समुदायाला जोडण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक अमूल्य साधन म्हणून काम करते. जनरल द्विवेदी यांनी प्रकाशित  केलेल्या या आवृत्तीमधून आपल्या माजी सैनिकांच्या योगदानाची दखल घेण्याचे महत्त्व अधोरेखित होते आणि त्यांच्या गरजा समर्पित वृत्तीने  आणि काळजीपूर्वक पूर्ण केल्या जातील हे सुनिश्चित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

ए. के. बालासुब्रमणयन यांनी स्वीकारली मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे

प्रख्यात शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी  01   जानेवारी  2026  रोजी मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद  (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे …