MV WAN हाय 503 या आग लागलेल्या जहाजावरील बचावकार्यासाठी भारतीय नौदलाने प्रयत्न सुरू केले. नौदलाने 13 जून 2025 रोजी आपल्या बचाव पथकाला हवाईमार्गे थेट जहाजावर उतरवण्याचे ठरवले. बचाव पथकाच्या सदस्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत कोची इथल्या आयएनएस गरुड येथून सीकिंग हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. बदलते हवामान, समुद्रातील दबलती स्थिती आणि जहाजावर लागलेली आग अशा आव्हानांचा सामना करत नौदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव पथकाला यशस्वीपणे जहाजावर उतरविले. जहाजावर उतरलेल्या बचाव पथकाने लगेचच पेट घेतलेल्या जहाजाला किनाऱ्यापर्यंत नेण्यासाठी दुसऱ्या नौकेशी जोडण्याचे काम केले. जहाजाला जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरने आपल्या बचाव पथकाला सुखरुपपणे परत आणले. जहाजाला किनारपट्टीवर घेऊन येण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सद्यस्थितीला, भारतीय नौदलाची आयएनएस शारदा ही गस्त नौका आणि आता ओएसव्ही एमव्ही ट्रायटन लिबर्टी नौका भारतीय तटरक्षक दल व अन्य सागरी यंत्रणांच्या समन्वयाने बचावकार्य करत आहेत. भारतीय नौदलाने अत्यंत तत्परतेने आपले बचाव पथक पाठवल्यामुळे मदतकार्याला गती मिळाली.
QPYW.jpg)
K29A.jpg)
Matribhumi Samachar Marathi

