Tuesday, December 23 2025 | 11:25:30 PM
Breaking News

फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 53 व्या आवृत्तीची गोव्यात सुरुवात; सशस्त्र दल, अभिनेते, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी

Connect us on:

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये सुरू केलेल्या देशव्यापी फिटनेस चळवळीच्या 53 व्या आवृत्तीचे आयोजन आज, 14 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी येथील मिरामार येथे करण्यात आले. ही मोहीम सायकलिंगला शाश्वत, सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक व्यायामाचा प्रकार म्हणून प्रोत्साहन देते.

मिरामार येथील या कार्यक्रमात सशस्त्र दलांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. सैन्यातील वीरांच्या सन्मानार्थ 53 वी आवृत्ती विजय दिनाला समर्पित करण्यात आली होती.

मिरामार बीच सर्कल ते दोना पावला आणि परतीचा मार्ग पार करून मोठ्या उत्साहात सायकलिंग रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्यांना तंदुरुस्ती, सामुदायिक बांधिलकी आणि गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण अनुभवता आले. सकाळी योग सत्रे, झुम्बा, गोव्याचे संगीत आणि मोठ्या प्रमाणावरील सहभागासह उत्साहाचे वातावरण दिसून आले. फिटनेस हा आनंददायी, सर्वसमावेशक आणि शाश्वत असतो या कल्पनेला यामुळे बळकटी मिळाली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे क्रीडा मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. फिट इंडिया चळवळ पुढे नेणे ही क्रीडाप्रेमींची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले . “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत मोहिमेत फिट इंडिया चळवळ महत्त्वाची भूमिका बजावते. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाला दुजोरा देत तवडकर म्हणाले, की गोव्यात नियमितपणे संडेज ऑन सायकल उपक्रम आयोजित केला पाहिजे, ज्यामुळे नागरिकांसाठी ही साप्ताहिक सवय बनेल,” असे त्यांनी सांगितले.

देशात क्रीडा संस्कृती मजबूत करण्याच्या गरजेबद्दल बोलताना, मंत्र्यांनी सांगितले की, अनेक युरोपीय देशांमध्ये सायकलिंग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि हजारो लोक दररोज सायकलींवरून प्रवास करतात. “आपणही अशीच संस्कृती रुजवणे आवश्यक आहे. जेव्हा मोठ्या संख्येने जनता या मोहिमेत सामील होईल, तेव्हाच फिटनेसच्या दिशेने वर्तणुकीतील खरा बदल शक्य होईल,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला तेलुगू चित्रपट अभिनेते मंचू मनोज कुमार आणि अभिनेते मोहम्मद अली यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. या प्रसंगी बोलताना, अभिनेते मोहम्मद अली यांनी फिटनेससाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आलेले पाहून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “नागरिकांना एका निरोगी राष्ट्रासाठी सक्रियपणे काम करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या चळवळीचा भाग बनून मला आनंद होत आहे.”

उपस्थितांना संबोधित करताना मंचू मनोज कुमार यांनी ‘फिट इंडिया’ चळवळीचे आणि माननीय पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीयुक्त  नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा प्रकारचे उपक्रम देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते तरुणांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

या कार्यक्रमात बॉक्सर सुभेदार मनीष कौशिक, अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कौटिन्हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर आणि भारतीय महिला फुटबॉल संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षक मेमोल रॉकी यांसारख्या नामांकित खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

गोवा सरकारचे क्रीडा सचिव संतोष गुणवंतराव सुखादेवे आणि गोवा सरकारचे क्रीडा व युवा व्यवहार संचालक डॉ. अजय आर. गौडे हे देखील खेळाडू, संरक्षण कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स, फिट इंडिया ॲम्बेसेडर आणि इतरांसोबत या उपक्रमात सहभागी झाले.

About Matribhumi Samachar

Check Also

एनजीएमए मुंबईने प्रसिद्ध कलाकार राव बहादूर एम. व्ही. धुरंधर यांच्यावरील पुस्तक केले प्रकाशित

मुंबई, 23 डिसेंबर 2025. द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबईने आज एनजीएमए मुंबई येथे …