Monday, January 12 2026 | 04:16:13 AM
Breaking News

भारतीय नौदल आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) या स्क्वाड्रनला ताफ्यात समाविष्ट करणार

Connect us on:

भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील आयएनएस हंसा या नौदलाच्या हवाई तळावर आपली दुसरी एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन,  आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. हा प्रसंग भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये प्रगत शस्त्रसज्जता, संवेदक आणि हवाई इलेक्ट्रॉनिक प्रणाली असल्याने ते भारतीय नौदलासाठी बहुउपयोगी आणि सक्षम साधन ठरते. पारंपरिक तसेच असमतोल धोक्यांना सामोरे जाण्यासाठी यामुळे क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होते.

हे हेलिकॉप्टर नौदलाच्या ताफ्याच्या परिचालनात पूर्णपणे एकात्मिक करण्यात आले असून अनेक प्रसंगी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. या स्क्वॉड्रनच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या अंगभूत हवाई क्षमतांना मोठी बळकटी मिळणार आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …