पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
या दुःखद घटनेबद्धल तीव्र शोक व्यक्त करताना,या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी मोदी यांनी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व भारतीय नागरिक ऑस्ट्रेलियाच्या लोकांसोबत एकजुटीने उभे असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.
या मुद्द्यावरील भारताची कणखर भूमिका पुन्हा अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी भारताचे दहशतवादाविषयीचे धोरण शून्य सहिष्णूतेचे आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारच्या आणि सर्व प्रकटीकरणाविरूद्ध असलेल्या जागतिक लढ्याला भारताचा ठाम पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील मंचावर लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणतात,
“ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व भारतीय नागरिक ऑस्ट्रेलियाच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. भारताचे दहशतवादाविषयीचे धोरण शून्य सहिष्णूतेचे आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारच्या आणि सर्व प्रकटीकरणाविरूद्ध असलेल्या जागतिक लढ्याला भारत ठाम पाठिंबा देत आहे”
Matribhumi Samachar Marathi

