Tuesday, January 27 2026 | 02:42:15 PM
Breaking News

पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सेना दिनाप्रीत्यर्थ भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे.  भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. “सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.” असे मोदी म्हणाले.

“दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे भारतीय सेना हे मूर्तिमंत प्रतीक आहे. आपल्या सीमांच्या रक्षणासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपल्या सैन्यदलाने मानवतावादी मदतकार्यात नेहमीच मोठा सहभाग नोंदवला आहे.”

“सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.पुढील काळातही आम्ही ते करत राहू. ”

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …