नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
नवउद्योजकता आणि नवोन्मेषाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या आयटीसी लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे.
या सहकार्यातून देशभरातील स्टार्टअपसाठी व्यवहार्य बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्याबरोबरच स्टार्टअप वाढ आणि त्यांच्या तांत्रिक प्रगतीला गती देण्यासाठी एक सामायिक दृष्टीकोन तयार होईल.
विशेष म्हणजे, हा सामंजस्य करार चैतन्यपूर्ण भागीदारीतून अशी सोय उपलब्ध करून देईल ज्यामुळे आयटीसी कंपनी व्यापक अनुभव आणि व्यापक मार्केट नेटवर्क कौशल्य या वैशिष्ट्यांच्या सोबतीने अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) देशभरातील स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी पुढाकार घेऊ शकेल.
आयटीसी कंपनी या भागीदारी अंतर्गत, मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्यूशन सिस्टीम्स (MES) साठी डिजिटल व्यासपीठे, उत्पादन स्थानांसाठी नवीकरणीय ऊर्जा संधी एकत्रित करणे, ऊर्जा साठवण प्रणाली इत्यादी प्रमुख क्षेत्रांमध्ये स्टार्टअप पर्याय तैनात करण्याचा विचार करत आहे.
या प्रो-स्टार्टअप उपक्रमावर प्रकाश टाकताना, अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीच्या विभागाचे संयुक्त सचिव संजीव म्हणाले की, हा उपक्रम भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या प्रमुख कार्यक्रमांशी अगदी जवळीक साधणारा आहे. शिवाय, नवोन्मेषाच्या नेतृत्वाखालील नवउद्योजकतेद्वारे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देत व्हिजन 2047 मध्ये योगदान देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. “आम्ही स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी वाढीव उपाय आणि परिवर्तनशील वाढ घडवण्यासाठी उत्सुक आहोत,” असे संजीव यांनी सांगितले.
दरम्यान,“हा करार स्टार्टअप्स आणि आयटीसी दोन्हीची प्रतिष्ठा वाढवेल. भविष्यासाठी सज्ज राहण्यात आणि उत्पादनामध्ये वाढीव कार्यप्रणाली उत्कृष्टता आणण्यासाठी तसेच आयटीसीचा शाश्वत विस्तार करण्यासाठी नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रात डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित करेल, असे आयटीसी कॉर्पोरेट अफेयर्स अध्यक्ष अनिल राजपूत यांनी नमूद केले.
Matribhumi Samachar Marathi

