कणकवली ज्वेलर्स असोसिएशनच्या सहकार्याने भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या वतीने 13 जानेवारी 2025 रोजी सराफांसाठी अर्धा दिवस जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आसपासच्या परिसरातील 40 सराफी व्यावसायिक उपस्थित होते, या कार्यक्रमात त्यांना प्रामुख्याने BIS प्रमाणीकरण, हॉलमार्किंग आणि बीआयएस केअर ऍप या गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्यात आली .

उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्राहक संरक्षण सुनिश्चित करण्याच्यादृष्टीने BIS मानकांच्या पालनाचे महत्त्व या विषयाचाही सत्रात समावेश करण्यात आला होता. BIS CARE ऍप्लिकेशनचा वापर करून HUID क्रमांकांच्या पडताळणीच्या प्रात्यक्षिकासह सहभागींना हॉलमार्क विशिष्ट ओळख (HUID) प्रणालीची ओळख करून देण्यात आली आणि अनिवार्य असलेल्या हॉलमार्किंग व्यवस्थेचीही माहिती देण्यात आली.
या व्यतिरिक्त वैज्ञानिक-डी/सहसंचालक टी. अर्जुन यांनी सराफी व्यावसायिकांना बीआयएस हॉलमार्किंग योजनेचे पालन करण्याची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. सहभागींना नमुना चाचणीच्या जबाबदाऱ्या, HUID क्रमांकांच्या नोंदी ठेवणे, नमुना चाचणी वारंवार अयशस्वी ठरल्यास करावयाची आवश्यक कृती या आणि अशा गोष्टींबाबतच्या शंकाचे, त्यांना वाटणाऱ्या चिंतांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तर सत्राचाही कार्यक्रमात समावेश होता. आभूषणे उद्योगात गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढवण्याच्या BIS च्या प्रयत्नांची सहभागींनी प्रशंसा करून, सकारात्मक प्रतिसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

