म्यानमारच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री महामहीम मिन मिन यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेतली. या बैठकीला दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
द्विपक्षीय व्यापाराच्या वाढीच्या संधींवर भर देत, मंत्र्यांनी औषध निर्मिती , डाळी आणि सोयाबीन , पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींचा आढावा घेतला. तसेच, अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या रुपया-क्यात व्यापार निपटान यंत्रणेचा अधिक व्यापक उपयोग करून परस्पर विकास करण्याच्या संभाव्यतेवर चर्चा झाली.

या बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी व्यापार वृद्धीला चालना देण्यासाठी सहकार्याच्या विविध संधींचा सविस्तर आढावा घेतला. रस्तेमार्गे सीमावर्ती व्यापार पुन्हा सुरु करण्याचे महत्त्व ओळखून यासंबंधी आवश्यक पावले उचलण्यावर सहमती दर्शवली.
Matribhumi Samachar Marathi

