Tuesday, December 09 2025 | 04:40:33 AM
Breaking News

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी विशाखापट्टणम सज्ज: वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

Connect us on:

जसजशी आंतरराष्ट्रीय योग दिनाची दशकपूर्ती जवळ येत आहे, तसतसा संपूर्ण भारतात तयारीला वेग आला आहे. यंदाच्या 11व्या आवृत्तीचे राष्ट्रीय यजमानपद लाभलेल्या विशाखापट्टणम शहरामध्ये आयुष मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाला  भेट देऊन एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पंतप्रधानांच्या  शेवटच्या गावातील व्यक्तीपर्यंत योगाचा प्रसार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे देशभरात या आयोजनाच्या तयारीला वेग आला असून या पार्श्वभूमीवर  हा आढावा घेण्यात आला.

या आढावा बैठकीत, आंतर-विभागीय समन्वय, जमवाजमव धोरणे, सुरक्षा शिष्टाचार आणि सांस्कृतिक एकात्मता यावर सविस्तर चर्चा झाली. पायाभूत सुविधांची तयारी आणि जनसामान्यांचा सहभाग यावर विशेष भर देण्यात आला, जेणेकरून योगाला जनचळवळ बनवण्याचे राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी आयोजन सर्व अंगांनी सुसंगत आणि प्रभावी राहील.

आंध्र प्रदेशच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असलेला “योगांध्र” उपक्रम हा अग्रगण्य उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील दोन कोटींहून अधिक नागरिकांना दररोज योगाभ्यासाची सवय लावणे हा आहे. जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठी आयोजित केलेल्या योगांध्रमध्ये जनजागृती मोहीम, शाळा आणि विद्यापीठांमध्ये योग शिबिरे आणि 20 लाख प्रमाणित योगसाधक घडवण्याची योजना समाविष्ट आहे. संपूर्ण राज्यात एक लाख ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे नियोजन असून केवळ विशाखापट्टणममध्ये पाच लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हा उपक्रम योगाला सर्वसमावेशक, सुलभ आणि परिवर्तनकारी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचे एक शक्तिशाली मूर्त स्वरूप आहे.

आयुष मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारच्या सक्रिय नेतृत्वाचे कौतुक केले असून या राज्याची व्यापक योजना आणि स्थानिक पातळीवरील सहभागाचे मॉडेल भारतीय परंपरेत रुजलेले जागतिक निरामयता  अभियान म्हणून आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या  उदयाला येत असलेल्या भावनेचे प्रतिबिंब आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता  कचऱ्यापासून …