Saturday, December 06 2025 | 06:59:07 PM
Breaking News

आसियान-भारत वस्तू व्यापार कराराचा आढावा घेण्यासाठी भारताकडून एआयटीआयजीए संयुक्त समितीच्या 10 व्या बैठकीचे आयोजन

Connect us on:

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025. भारताने 10 ते 14 ऑगस्ट, 2025 दरम्यान नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार (एआयटीआयजीए) संयुक्त समितीची 10 वी बैठक आणि संबंधित बैठकांचे आयोजन केले. संमिश्र स्वरूपात झालेल्या या बैठकांचे सह-अध्यक्षपद भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव आणि मलेशियाच्या गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उपमहासचिव (व्यापार) मस्तुरा अहमद मुस्तफा यांनी भूषवले. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या सर्व दहा आसियान सदस्य देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले.

संयुक्त समितीने एआयटीआयजीएची परिणामकारकता, सुलभता आणि व्यापार सुविधा क्षमता वाढविण्यासाठी सुरु असलेल्या आढाव्याला गती देण्यावर लक्ष केंद्रित केले. वाटाघाटींच्या आठ सक्रिय फेऱ्यांद्वारे झालेल्या प्रगतीवर चर्चा झाली.

एआयटीआयजीए संयुक्त समिती अंतर्गत आठ उप-समित्यांपैकी सात उप-समित्यांची देखील या निमित्ताने बैठक झाली. यात : सीमाशुल्क प्रक्रिया आणि व्यापार सुविधा (SC-CPTF), कायदेशीर आणि संस्थात्मक समस्या (SC-LII), राष्ट्रीय मान्यता आणि बाजार प्रवेश (SC-NTMA), स्वच्छता आणि फायटोसॅनिटरी (SC-SPS), उत्पत्तीचे नियम (SC-ROO), मानके, तांत्रिक नियम आणि अनुरूपता मूल्यांकन प्रक्रिया (SC-STRACAP), आणि व्यापार उपाय (SC-TR) उपसमित्यांचा समावेश होता . या बैठकांमुळे एआयटीआयजीए अद्यतनित करण्याच्या व्यापक उद्दिष्टांना अनुरूप दृढ सहकार्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

भारताच्या जागतिक व्यापाराच्या सुमारे 11% वाटा असलेला आसियान हा भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. 2024–25 मध्ये द्विपक्षीय व्यापार 123 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला, ज्यातून दोन्ही बाजूंमधील मजबूत आर्थिक संबंध आणि आगामी काळात सहकार्य वाढवण्याच्या संधी निर्माण करणे प्रतिबिंबित होते.

एआयटीआयजीए संयुक्त समितीची पुढील बैठक 6–7 ऑक्टोबर 2025 रोजी इंडोनेशियातील जकार्ता येथील आसियान सचिवालयात होणार आहे आणि त्याचे यजमानपद मलेशिया भूषवणार आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …