Saturday, January 03 2026 | 05:00:27 AM
Breaking News

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एन आय एन) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Connect us on:

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2025. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एन आय एन ) पुणे येथे, गोहे बुद्रुक, आंबेगावच्या बापू भवनामध्‍ये असलेल्या निसर्गग्राम आणि निसर्गसाधना आरोग्य केंद्रामध्‍ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली. यावेळी परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारून गेला.

पाहुण्यांचे स्वागत करतांना एन आय एन च्या संचालिका प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी भारताच्या स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि समृद्धीकडे झालेल्या प्रवासात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. निसर्गग्राम व निसर्गसाधना आरोग्य केंद्र या संस्थांची निसर्गोपचार, योग आणि पारंपरिक उपचारपद्धतींचे आधुनिक जीवनशैलीत एकत्रीकरण करून सर्वांगीण आरोग्य घडविण्यातील भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

या प्रसंगी डॉक्टर, उपचारकर्ते आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या निष्ठा आणि सेवेबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशभक्तीपर गीते , नृत्यांद्वारे भारताच्या समृद्ध परंपरेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच क्रीडा स्पर्धां घेण्‍यात आल्या. या कार्यक्रमाला अधिकारी, विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी तसेच आरोग्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेबद्दल:

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था – निसर्गग्राम, ही भारत सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असून, सर्वांगीण आरोग्यविषयक पद्धती व उपचारांचा प्रचार-प्रसार करण्यास समर्पित आहे. निसर्गोपचार आणि पारंपरिक औषधोपचार या क्षेत्रात ही संस्था शैक्षणिक व संशोधन केंद्र म्हणून कार्य करते. नैसर्गिक उपचारपद्धतींद्वारे जीवनमान सुधारण्यासाठी ही संस्था प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि संशोधन उपक्रम राबविते.

About Matribhumi Samachar

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये  आज (29 डिसेंबर, 2025) झारखंडमधील जमशेदपूर …