Friday, January 02 2026 | 12:28:16 PM
Breaking News

राष्ट्रीय आदिवासी महोत्सव ‘आदि महोत्सव’ चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Connect us on:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 16 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सव ‘आदि महोत्सव’ चे उद्घाटन केले.

आदि महोत्सव हा आदिवासी वारसा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याला  प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केले आहे. असे उत्सव आदिवासी समाजातील उद्योजक, कारागीर आणि कलाकारांना बाजारपेठेशी जोडण्याची उत्तम संधी प्रदान करतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. आदिवासी समाजातील हस्तकला, खाद्यपदार्थ , पोशाख आणि दागिने, वैद्यकीय उपचार पद्धती, घरगुती उपकरणे आणि खेळ हे आपल्या देशाचा  मौल्यवान वारसा आहेत. त्याच वेळी, ते आधुनिक आणि वैज्ञानिक देखील आहेत, कारण ते निसर्गाशी आणि शाश्वत जीवनशैलीच्या मूल्यांशी  नैसर्गिक सुसंवाद दर्शवतात, असे मुर्मू म्हणाल्या.

गेल्या 10 वर्षात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रभावी पावले उचलण्यात आली असून, आदिवासी विकासासाठी तरतुदीत अर्थसंकल्पात पाच पटीने वाढ होऊन सुमारे 1 लाख 25 हजार कोटी रुपये करण्यात आले आहेत. याशिवाय, आदिवासी कल्याण तरतुद देखील तीन पट वाढून सुमारे 15 हजार कोटी रुपये झाली  आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

जेव्हा आदिवासी समाज प्रगती करेल तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल आणि आदिवासी समाजाच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यामागे देखील हीच  कल्पना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी अस्मितेप्रति गौरवाची  भावना वाढवण्याबरोबरच, आदिवासी समाजाचा जलद गतीने विकास करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न केले जात आहेत, असे मुर्मू यांनी सांगितले. देशातील 470 हून अधिक एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधून सुमारे 1 लाख 25 हजार आदिवासी मुले शालेय शिक्षण घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे. गेल्या 10 वर्षात, आदिवासी बहुल भागात 30 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली.

About Matribhumi Samachar

Check Also

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने …